बालाची पाचवी झाली, अणि सरवेजन सदरे मध्ये जमा झाले. प्रत्येक जन वाट पाहत होता ती शास्त्रिबुवा न ची . शास्त्रिबुवा सुद्धा आले. आशीर्वाद पुट्पुतात शास्त्रिबुवा आसनस्थ झाले. बालंत घरा च्या दाराशी सारे जन आतुरतेने बालाचे भाकित ऐकायला जमा झाले होते .
॥ श्री गणेशाय नमः ॥ शुभम भवतु ....
शास्त्रिबुवान नि पंचांग उघडला , त्यांची बोटे गणित मांडू लागली... कुंडली ची घरे ग्रहा नि भरु लागली. कुंडली मांडून झाली आणि शास्त्रिबुवा न च्या कपालाच्या अथ्या वर वर चढू लागल्या. त्यानी वर पाहून सगल्या न वरून नजर फिरवली अणि शेवट जिजाबाई न कड़े पाहू लागले...
जिजाबाई म्हणल्या...
शाश्त्रिबुवा कोणतीही खंत मन मध्ये ठेवू नका, या पोराच्या वेळी दिवस गेले आणि सगळ्या घरा दाराचा थारा उडाला, कोणाचा कोणामध्ये मेळ राहिला नाही, रक्ता ची नाती वैराची झाली, जहागिरिवर नांगर फिरला, अजोबाचा छात्र गमावल, सगल्या मुलुखाची अवदसा झाली, आमच्या आया बहिनी पलवुन नेल्या गेल्या, अणि मी ही अशी... न सासरी न माहेरी, अश्या या परमुलुखत याला जन्म दिला. पोटा मध्ये असताना ही तरहा, अता याचा जन्माने अजुन काय पदरात येणार आहे तेवढा सांगुन टाका ... आजपर्यंत या जीजा ने खुप सोसलय, परमेश्वरा ने काही सुद्धा ऐकायची शक्ति अजुन माझा मध्ये ठेवली आहे... सांगा शास्त्रिबुवा सांगा....
जिजाबाई इतका सगळ बोलुन सुद्धा शास्त्रिबुवा न च्या चेहरया वरची रेघ सुद्धा हलली नाही. ते अजुन सुद्धा त्याच शांतते मध्ये पाहत होते. " राणिसहेब असल अभद्र मनामध्ये आनु नका, दुर्भाग्य संपला अत , भाग्य उजाडला आहे..प्रत्यक्षा सूर्य पोटी जन्माला आला आहे आपल्या...
हुम्ह्ह , जिजाबाई खिन्न मनाने हसल्या , " प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो नव जन्मासाठी"
आता मात्र शास्त्रिबुवा उभे राहिले, अन त्याच खन्खानित आवाजात बोलू लागले. सगला वाडा त्यांच्ये शब्द मना मध्ये साठवत होता " राणिसहेब, अविश्वास धरु नका. आजवर या शास्त्र्या चे भाकित खोट ठरल नाही, द्रव्य लोभाने नाही , तर अनुभवाने सांगतो आहे... हे मूल जन्म्जन्मंतरी च पांग फेडिल, पापा चा घड़ा भरला आता, एक विसरु नका , धरित्री वरचा दानवा न चा तांडव वाढला असता, पाप वाढले तेव्हा भगवान श्रीकृष्णा ने देवकी-वासुदेव च्या पोटी जन्म घेतला होता, अणि तोही कंसा च्या बंदी शाले मध्ये. वनवास रामाला सुद्धा चुकला नाही, म्हणून रावण अंत व्हायचा थांबला होता का ? ? ? नाही ना... लक्षात असुदया राणिसहेब , प्रत्यक्ष भगवान् शंकरा चा तीसरा डोळ्या मध्ये जी अचाट शक्ति आहे, तीच या शहापुत्रा मध्ये पहायला मिळेल... "
सर्व जन थकक झाले होते, कोणाला काय बोलाव सुचत नव्हते . बाल शिवाजी मात्र मुठी चोखत आई च्या कुशी मध्ये शांत पणे झोपी गेला होता........