About Me

Hello friends, First of all thanks for visiting my blog. I am passionate for Shivaji Maharaj, & I m sharing a little knowledge with you. So kindly, help me if i m wrong anywhere. Thanks

Monday, July 26, 2010

आज दिवस सोन्याचा उजाडला, शिवरायाचा जन्म जाहला ....

लखुजी जाधव च्या बातमीने जिजाबाई पुरत्या खचून गेल्या होत्या, रात्रि अपरात्री त्याना जाग येत असे. सार अंग घामाने दबदबुन निघत असे. शिवनेरी समोर च्या लेन्याद्री ला सुद्धा कापरा सुटायला लागला होता . एक दिवस अचानक जिजाबाई च्या समोर क्ष्मी बाई येउन उभ्या राहिल्या अणि त्यानी त्यांचा मायेच्या रागाने चांगलच बोलून दाखवल ... " की हे चालावालय काय राणिसहेब , जे झाला त्याच आम्हाला वाईट का वाटत नाही, सर्वाना वाटते... आपल काय, निदान त्या पोटा मधल्या पोराची तरी कालजी करा... या सगल्या त्रासाचा परिणाम त्या पोरावर झाल्या खेरीज राहिल का... ? "

जिजाबाई भानावर आल्या... लक्ष्मीबाई जे बोलल्या ते सगला खरा होता. आता त्यांच्या वागण्यात पुन्हा सर्वाना बदल जाणवू लागला होता. जिजाबाई पुन्हा वाड्या मध्ये वावरू लागल्या. सह्याद्रीचा सूर्य आता वाट पाहत होता या विश्वात येण्याची... नऊ महीने संपले होते. विश्वास रावा नि गडावर ब्रह्मण अनुष्ठानाला बसवले होते. निष्णात सुइनी , वैद्य , गडावर सेवेला हजर होते.

दो प्रहरचा सूर्य कलला होता. गार वारा गडावर सुटला होता. वैद्यराज , विश्वासराव , गोमाजी नाइक , अणि मंडली सदरे मध्ये पान जमावित बसली होती, तितक्यात दासी आली.... " रानिसहेबांच्या पोटात दुखायला लागलय"

सर्व जन अदबीने उठून तिकडे निघाले, पण थोडाच वेळात लक्षात आल की तिकडे जाउन काही उपयोग व्हायचा नाही. प्रहर मुंगीच्या पवालानी पुढे सरकत होता, सायंकाल झाली तरी काही बातमी नाही, विश्वास राव, वैद्य सर्व जन विचार करत बसले होते... तेवढ्यात दासी धावत आली , तिच्या चेहरा सांगत होता तिला किती आनंद झालय ते.... "धनि , धाकल मालक आल्याती ... " विश्वास राव आनंद लपवू शकत नव्हते. त्यानी अंगावरचा कंठ तसाच दासी च्या अंगावर भिरकावला. शास्त्रिबुआ पुत्रजन्माच्या घटाका मोजण्यात गुंतले।

सह्याद्रीचा सूर्य जन्माला आला होता.. दृष्टांचा कर्दनकाल जन्माला आला होता.. गरिबांचा कैवारी जन्माला आला होता.... वैशाख शुद्ध , अक्षय तृतीय , शके १५४९ म्हणजेच एप्रिल , १६२७ साली रात्रप्रहरी छत्रपति शिवाजी महाराजांचा जन्म जाहला...

END OF THE TOPIC

Note : Picture displayed in the post is the birth place of Shivaji maharaj on fort Shivneri , on which small Shiv Mandir Stands.




No comments:

Post a Comment